स्व.नारायणरावजी वानखडे विद्यालय आडसूळ येथे शिक्षक सेवानिवृत्ती समारंभ साजरा

श्याम पहूरकर
स्टार भारत न्यूज लाईव्ह शेगाव विशेष न्यूज रिपोर्टर


शेगाव तालुक्यातील आडसूळ येथे 30 /11/ 2022 रोज विद्यालयातील शिक्षक श्री पांडुरंग कोकाटे सर शारीरिक शिक्षक हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत त्या प्रित्यर्थ विद्यालयामध्ये सेवानिवृत्ती समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री दयाराम भाऊजी वानखडे, सौ. सुशिलाताई वानखडे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री आत्मारामभाऊ वानखडे, गावच्या सरपंचा सौ. सुनीताताई वानखडे, वानखडे विद्यालय वरवट खंडेराव चे मुख्याध्यापक श्री अनंताजी वानखडे सर तसेच बहुसंख्य गणमान्य उपस्थित होते या प्रित्यर्थ माननीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष साहेबांनी कोकाटे सरांचे व त्यांच्या पत्नीचे भर अहिर देऊन स्वागत केले व आमच्या शिक्षण संस्थेला पांडुरंग कोकाटे सर यांनी 1 जुलै 1995 पासून एकूण 27 वर्ष सेवा दिली. व 27 वर्ष नवीन व सुशिक्षित पिढी घडवण्याचे कार्य केले. अशा प्रकारचे अभिमानास्पद उद्गार काढून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांनी त्यांचा गौरव केला. इतक्या वर्ष विद्यार्थ्यांना शिक्षण सेवा देऊन तसेच माननीय उपाध्यक्ष साहेबांनी भेट वस्तू देऊन कोकाटे सरांचा सत्कार केला विद्यालयातील सर्व कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांच्या वतीने कोकाटे सरांचे भेट वस्तू देऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विलास मसने सर यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन श्री गोमासे सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर खोट्टे सर यांनी केले या कार्यक्रमाला पंचकोशीतील बहुसंख्य पालक तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थि विद्यार्थिनी उपस्थित होते याप्रसंगी सर्व विद्यार्थी व उपस्थित पालकांना व निमंत्रितांना स्वादिष्ट भोजनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील श्री लांबे सर, श्री लमक सर ,श्री हिवराळे सर, श्री साबळे सर ,श्री बुरुकले सर ,शिपाई अनंता पातळे, गजानन कोल्हे, योगेश पवार यांनी मोलाचे योगदान दिले



