बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा नगर परिषद मध्ये अनुसूचित जातीचा कर्मचारी यांच्यावर होत असलेले अन्याय विरुद्ध आंदोलन

तेल्हारा प्रतिनिधी

सध्या स्थिती सेवानिवृत्त झालेले तेल्हारा नगरपरिषद चे कर्मचारी श्रीकृष्ण वायधन पोहरकर राहणार मिलिंद नगर तेल्हारा जिल्हा अकोला येथील रहिवासी असून ते तेल्हारा नगरपरिषद येथे लिपिक या पदावर होते व दिनांक 30 /06 /2026 रोजी लिपिक पदावरून सेवा निवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर पेन्शन लागू होण्याकरिता आवश्यकते कागदपत्रांची सेवा पुस्तक अद्यावत पूर्ण करून नगरपरिषद प्रशासनाकडे वेळेवर सादर केले असून सदर तेल्हारा नगरपरिषद चे मुख्य अधिकारी पदावर असलेले सतीश गावंडे हे पेन्शन प्रस्ताव तयार करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे दिलेल्या अर्जामध्ये एक ते चार मुद्देवाहीस लेखणीमध्ये उल्लेख केलेले या अर्जात आहे सेवानिवृत्त असलेले कर्मचारी श्रीकृष्ण पोहरकर हे वेळोवेळी पाठपुरावा करूनही यांना पेन्शन पासून वंचित असल्याचे आरोप असल्याने अर्जदार यांचे या अर्जामध्ये मी एक दलित अनुसूचित जातीचा असल्याने मला नगरपरिषद चे मुख्याधिकारी सतीश नारायण गावंडे यांनी मला पेन्शनचा लाभ मिळू नये याकरिता माझ्या फाईल मध्ये कोणती न कोणती त्रुटी काढून मला मानसिक त्रास देत मला पेन्शन पासून वंचित ठेवत असल्याने त्या करिता न्याय मिळणे करिता येणाऱ्या दिनांक 24 ऑगस्ट 2026 पासून नगरपरिषद कार्यालयीन वेळेत नगर परिषद कार्यालयांमध्ये ठिया आंदोलन सत्याग्रह पुकारण्यात येईल यासोबत शासनाचे परिपत्रक अर्जाला जोडलेले आहे तरी जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन खालील प्रमाणे योग्य ती कारवाई करावी असे या अर्जामध्ये लेखी स्वरूपात दिली आहे तसेच तेल्हारा नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना माझा पेन्शन प्रस्ताव विना विलंब व तातडीने तयार करून संबंधित विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचे तसेच अनुसूचित जातीचा असल्याचा कारणावरून जाणीवपूर्वक विलंब व मानसिक त्रास देण्याच्या संबंधित अधिकाऱ्यावर शासकीय नियमानुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच मला आपल्याकडून सकारात्मक निर्णयाची व न्यायाची अपेक्षा अर्जदार यांनी अर्जातून व्यक्त केली आहे तसेच अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे सेवानिवृत्ती अहवाल जातीचा दाखला पेन्शन प्रस्तावासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत ओळखपत्राची प्रत आधार कार्ड पॅन कार्ड ही सर्व समाविष्ट अर्ज सोबत दिले आहे सदर अर्जाच्या लिपी माननीय जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन अकोला मुख्य अधिकारी नगरपरिषद तेल्हारा पोलीस स्टेशन तेल्हारा येथे देण्यात आल्या

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button