शेलगाव जहागीर येथील बौद्ध महिलेला गंभीर मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपींना पोलिसांचे अभय

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
शेलगाव जहागीर येथील बौद्ध महिला उषा रमेश साळवे यांना त्यांच्या शेतात गट नंबर 85 मध्ये दिनांक 30/6/2026 रोजी शेलुद येथील आरोपी किसन सुखदेव शिराळे शिवाजी किसन शिराळे सुनील किसन शिराळे जिजाबाई किसन शिराळे यांनी जब्बार मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली होती त्या अनुषंगाने चिखली पोलिसांनी आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा भारतीय न्याय दंड संहिता कायद्याचे विविध कलमानुसार गु.रं.नं.572/2026 दाखल केला आहे .त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील समस्त दलित समाज आक्रोशीत झाला होता. त्यादरम्यान पीडित महिला दवाखान्यात भरती असताना खासदार मा.प्रतापरावजी जाधव आमदार सौ श्वेता ताई महाले ,पॅंथर सेनानी भाई दीपक केदार तसेच सरसेनानी आनंदराज जी आंबेडकर साहेब व इतर समाजातील पुढाकारांनी गावकऱ्यांनी चिखलीतील तसेच संपूर्ण आंबेडकर समाजाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी भेट देऊन आरोपींना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली होती.
परंतु तपास यंत्रणेने यामध्ये आरोपींनी बुलढाणा येथील मा. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता त्यावेळी फिर्यादीचे वतीने बौद्ध समाजातील ॲड आर डी जाधव ॲड अंबादास जाधव ॲड अरुण गवळी ॲड शंकर चव्हाण या सर्वांनी हरकत अर्ज दाखल केला होता त्यावर मा. सत्र न्यायालय यांनी किसान सुखदेव शिराळे आरोपी व त्यांचा मुलगा शिवाजी किसन शिराळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला परंतु सुनील किसन शिराळे व जिजाबाई किसन शिराळे यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. वास्तविकपणे दिनांक 30/6 2026 पासून आरोपी बुलढाणा जिल्ह्यातच वास्तव्यात होते. तरीसुद्धा पोलीस यंत्रणेने त्यांना अटक केले नाही याचा फायदा घेऊन आरोपी किसान सुखदेव शिराळे व शिवाजी किसन शिराळे या दोघांनी उच्च न्यायालय नागपूर येथे सत्र न्यायालय बुलढाणा यांनी नामंजूर केलेला अटकपूर्व जामीन अर्जाचे आदेशाविरुद्ध क्रि. अपील 377 /2026 हे दाखल करून त्यामध्ये तात्पुरता जामीन अर्ज दाखल केला होता परंतु प्रकरणाचे गांभीर्य पाहून मा उच्च न्यायालय यांनी दिनांक 30/ 7 /2016 रोजी सदरचा तात्पुरता जामीन अर्ज सुद्धा नामंजूर केला आहे.
वास्तविकपणे मा .न्यायालयाने अजून आरोपींना कोणताही जामीन आदेश पारित केला नाही. पोलीस यंत्रणा अजूनही आरोपींना अटक करून सदर गुन्ह्याचा सखोल तपास करू शकतात परंतु तसे करण्यास तपास यंत्रणेचे उदासीनता दिसून येत आहे त्यामुळे आरोपींना तपास यंत्रणेचे अभय असल्याबाबत आंबेडकरी समाजामध्ये उघडपणे बोलले जात आहे .
परंतु यानंतर सुद्धा सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली नाही तर सर्व आंबेडकरी सर्व समाज आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे.



