बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
अंत्रि खेडेकर येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर खेडेकर

स्टार भारत लाइव एक्सप्रेस
प्रतिनिधि-संजय खेडेकर
चिखली,-तालुक्यातील अंतरी खेडेकर येथिल जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर
खेडेकर यांची तर उपाध्यक्षपदी श्रीकांत मोरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच पती सचिन खेडेकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संतोष मोरे, शांताराम मोरे, दिगंबर खेडेकर, बारीकराव खेडेकर, समाधान मोरे, पिंटू जिने, गणेश पराड, आरिफ सय्यद, आदी उपस्थित होते, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमध्ये मनीषा पोपळघट, सौ. चंद्रभागा माळेकर, सोफिया शेख, अर्चना मोरे, पूजा खेडेकर, अशोक पवार आदींचा समावेश करण्यात आला आहे.



