बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री गजानन महाराज पालखी सोहळा. खामगाव नगरीत भक्तिमय वातावरणात आगमन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी

संगीता उमाळे

दि.१८/८/२०२६.
खामगाव: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर कडे रवाना झालेली आणि परतीच्या प्रवासात खामगाव नगरीत आगमन झाले. श्री. संत गजानन महाराजांची पालखी सोहळ्याचे आज टाळ. मृदंगाच्या गजर आणि गण गण गणात बोते. च्या जय घोषात पालखी खामगावात दाखल झाली. पालखीच्या आगमनाने संपूर्ण खामगाव नगरी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो भाविकांनी पालखीचे आणि वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.
भाविकांसाठी पाणी. महाप्रसादाची सोय . येथील नागरिकांनी केली होती.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीच्या पादुकांची पूजा करण्यात आली. महिन्याभराचा पायी प्रवास करून परतलेले या दिंडीतील वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकल्या ऐवजी श्री चे दर्शनाचा आनंद स्पष्ट दिसत होता
यावेळेस शेगाव संस्थान आणि प्रशासन यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button