बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी प्रसन्नजीत दादा पाटील यांची अविरोध निवड…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद:- १२ ऑगस्ट २०२६
सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची पावती; जळगाव जामोद तालुक्यात समर्थकांकडून जल्लोष पणन महासंघाचे उपाध्यक्ष, जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा सहकार क्षेत्रातील नेतृत्व म्हणून कार्यरत असलेले प्रसन्नजीत दादा पाटील यांची बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीमुळे जळगाव जामोद तालुक्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून शेतकरी, व्यापारी तसेच सहकारी संस्थांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अविरोध निवड झाल्याने त्यांच्या नेतृत्वावर सहकार क्षेत्रातील विविध घटकांनी दाखविलेला विश्वास अधोरेखित झाला आहे. या उल्लेखनीय निवडीबद्दल प्रसन्नजीत दादा पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील सहकार चळवळीला आणखी नवी ऊर्जा व बळकटी मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी सुरेश थोटे, आशिष शेलके, वैभव मुरकुट, पुरुषोत्तम मुरुख यांच्यासह स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी प्रसन्नजीत दादा पाटील यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्रातील अनुभव, शेतकरीहिताची भूमिका आणि संघटनात्मक कार्याच्या जोरावर मिळालेली ही अविरोध निवड त्यांच्या नेतृत्वाची नवी ओळख निर्माण करणारी ठरली आहे…..



