संत नामदेव महाराजांच्या ६७६व्या संजीवनी समाधी पुण्यतिथीनिमित्त कवठळ येथे भक्तिरसाचा जागर; देवगिरीकर यांच्या निवासस्थानी भजन-कीर्तनाने वातावरण दुमदुमले

स्टार भारत न्यूजसाठीभगवान पाखरे जिल्हा प्रतिनिधी
कवठळ येथे संत नामदेव महाराजांच्या ६७६व्या संजीवनी समाधी पुण्यतिथीचा भक्तिमय सोहळा कवठळ (ता. संग्रामपूर) : भगवान पाखरे, जिल्हा प्रतिनिधीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७६व्या संजीवनी समाधी पुण्यतिथीनिमित्त कवठळ, ता. संग्रामपूर येथील वैष्णवी शिंपी समाजातील प्रतिष्ठित व धार्मिक वृत्तीचे श्री. मनोहरराव देवगिरीकर यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ऋषिकेश सुभाष देवगिरीकर तसेच संपूर्ण देवगिरीकर परिवाराच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या वतीने संत नामदेव महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित अभंग व भक्तिगीते सादर करण्यात आली. त्यामुळे परिसरात भक्तिरसाचे वातावरण निर्माण झाले.या भजन कार्यक्रमात हार्मोनियम वादनाची साथ तसेच तबला आणि खंजिरीच्या तालावर विविध अभंग सादर करण्यात आले. ऋषिकेश पाटील, कैलास पाटील, गजानन महाराज शिरसागर यांनी वाद्यसाथ दिली. तर दिनेश महाराज भामदे, मुकुंद महाराज शिरसागर, खोले महाराज, गजाननराव देशमुख, आशिष देशमुख, अंकुश मुंडे, गोपाल बापरे, समाधान भाऊ लटके, प्रकाश पाटील, सुधाकर करूना, सचिन पाटील, हरिचंद्र जमेवार, सावंजी भामदे, विलासराव देशमुख, मनोहरराव देवगिरीकर, संदीप भामदे यांच्यासह भजन मंडळातील अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक शिस्तीचाही संदेशसंत नामदेव महाराजांनी आपल्या अभंग आणि भक्तीपरंपरेतून समाजाला समता, बंधुभाव, सदाचार आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच समाजात परस्पर स्नेह, शांतता आणि सामाजिक एकोपा मजबूत होण्यास मदत होते. कार्यक्रमादरम्यान शिस्त व शांतता राखत धार्मिक वातावरण अबाधित ठेवण्यात आले.रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या भक्तिमय कार्यक्रमाचा समारोप आरतीने करण्यात आला. उपस्थित भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या विचारांचे स्मरण करून समाजात सद्भावना आणि एकोपा कायम ठेवण्याचा संदेश घेतला.



