बुलढाणाविदर्भ

देऊळगाव राजा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची उपस्थिती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:येथील संजय नगर प्रभाग क्र. १ मध्ये जागतिक आदिवासी दिन अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्र. १ च्या आदिवासी बांधव अनिल पवार,व तसेच नगरसेविका मीनाताई दराडे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी बांधवांनी एकत्र येत पारंपारिक उत्साहात हा दिन साजरा केला.

मान्यवरांचा भव्य सत्कार

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी समाजाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. समाज बांधवांनी दाखवलेल्या या आदराबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष आभार मानले.

हक्क आणि सशक्तीकरणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प

याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि उपस्थित मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. “आदिवासी समाजाचा इतिहास हा गौरवशाली संघर्षाचा आहे. त्यांची समृद्ध संस्कृती, निसर्गपूरक परंपरा आणि देशाच्या विकासातील योगदान अतुलनीय आहे. आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण सशक्तीकरणासाठी आपण सदैव कटिबद्ध राहूया,” असा पुनरुच्चार मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला.या कार्यक्रमाला

सुभाष दराडे सर,गोपाल व्यास,संदीप शिंदे आकाश कासारे,अनिल पवार,विजय शिंदे,नंदू पवार ,देविदास पवार ,नितीन सोनूने ,आमिन भोसले,रामदास पवार ,किशोर शिंदे
संजय नगर प्रभागातील आदिवासी बांधव, महिला, तरुण आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button