बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

कवठळ येथे पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेचा शुभारंभ; आमदार संजय कुटे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ७ ऑगस्ट २०२६
बँकिंग सुविधेपासून वंचित असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा ग्रामस्थांच्या आर्थिक व्यवहारांना मिळणार नवी चालना संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथे पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) नवीन शाखेचा शुभारंभ शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडला. आमदार तथा माजी मंत्री मा. श्री. संजयभाऊ कुटे यांच्या हस्ते फीत कापून या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंजाब नॅशनल बँक मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती. कवठळ येथे पंजाब नॅशनल बँकेची शाखा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विविध घटकांना बँकिंग सेवा आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.नवीन शाखेमुळे खाते उघडणे, आर्थिक व्यवहार, कर्जविषयक सेवा, बचत योजना, डिजिटल बँकिंग यांसह विविध बँकिंग सुविधा नागरिकांना सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बँकेच्या कामासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची नागरिकांची गैरसोय कमी होणार असून कवठळसह परिसरातील आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रसंगी मा. सौ. नित्या कल्याणी रंगनाथन, मंडळ प्रमुख, पंजाब नॅशनल बँक मंडळ कार्यालय, नाशिक, सौ. दीक्षा नरेंद्र खंडेराव, सरपंच कवठळ, श्री. जितेंद्र जयसिंग बयास, उपसरपंच कवठळ, तसेच सौ. संध्या श्रीराम अंभोरे, ग्रामविकास अधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे निमंत्रक रोहिदास गायकवाड (शाखाप्रमुख, कवठळ) यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कवठळ गट ग्रामपंचायत कार्यालय, कवठळ, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे गावाच्या विकासात आणि स्थानिक आर्थिक व्यवहारांना निश्चितच नवी दिशा मिळणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button