बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून साडेसहा लाखाची फसवणूक बनावट जॉइनिंग लेटर देणाऱ्या वर गुन्हा दाखल..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस हरिदास इंदोरे जळगाव जामोद

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट जॉइनिंग लेटर पाठवून एका शेतकऱ्याची तब्बल 6 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष प्रल्हाद जाधव वय वर्ष 38 व्यवसाय शेती राहणार आसलगाव, तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ब्रिज मोहन शंकरलाल सराटे रा कॉसिनोवा बिल्डिंग, रूम क्रमांक 14, संतोषी माता रोड, रामदास वाडी साईबाबा मंदिरासमोर कल्याण जिल्हा ठाणे, त्यांच्या विरुद्ध कायमी गुन्हा क्र 502/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 (4)336(6)व 340(2) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार आरोपीने फिर्यादीला रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रेल्वेचे बनावट जॉइनिंग लेटर पाठवून वेळोवेळी रु 6लाख 50 हजार रु रक्कम स्वीकारली मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही फसवणूक 15 सप्टेंबर 2024 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.मा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या आदेशानुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे हे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. नोकरीच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास न ठेवता संबंधित भरती प्रक्रियेची अधिकृत पडताळणी करूनच आर्थिक व्यवहार करावेत असे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button