महाराष्ट्र
२६ /०९/२०१२ ला शेगाव आगाराची बस शेगाव – पातुर्डा”

२६ /०९/२०१२ ला शेगाव आगाराची बस
“शेगाव – पातुर्डा”
( भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) येतांना खिरोडा पुलाहुन नदिपात्रात कोसळली आणि या दुर्घटनेत तब्बल १९ जणांना मृत्युला सामोरे जावं लागले, व अनेक जण गंभीर जखमी झाले आणि एकाचं तालुक्यातील तब्बल १९ जणांच्या अंतयात्रेचे ते दृष्य आजही डोळ्यासमोर आले कि डोळे आपोआप पाणावतात…आणि अंगावर क्षहारे ऊभे राहतात….या दुर्घटनेची वेळी डॉक्टर श्री रामेश्वर पुरी साहेब तत्कालिन तहसिलदार शेगांव तथा विद्यमान उपविभागीय अधिकारी, खामगांव यांनी जखमी लोकांना वाचविण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले होते,काळ निघून जातो पण आठवणी कायम राहतात.त्या अपघातात मृत पावलेल्या नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली



