वाडी ब्रम्हपुरीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली:तालुका : प्रतिनिधी
अरुणा दत्ता खंडागळे
डीजेच्या दणदणाटात भव्य शोभायात्रा; युवक-युवतींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, सामाजिक ऐक्याचे दर्शन
चिखली :तालुक्यातील: वाडी ब्रम्हपुरी
जगविख्यात साहित्यिक, साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाडी ब्रम्हपुरी येथे उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातून डीजेच्या तालावर काढण्यात आलेल्या शोभायात्रेने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. युवक-युवती, महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शिस्तबद्ध आणि शांततेत जयंती उत्सव साजरा केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मातंग सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाई छोटू कांबळे, कृष्णा साळवे, कामगार नेते गजानन पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गुलाबराव जाधव, सरपंच संदीप वानखेडे, उपसरपंच अंबादास वानखेडे, माजी सरपंच चंद्रकांत वानखेडे, माजी सरपंच दीपक जाधव, बंडू सर, राजेंद्र वानखेडे, शिवसेना नेते दिलीपराव वानखेडे, नामदेव जाधव, किन्होळ्याचे सरपंच वसंता जाधव, किशोर निकाळजे, पोलीस पाटील परशुराम अंभोरे, शेख जिया भाई,तुकाराम जाधव,बिट जमदार अनिल वाघ आणि रायटर अमोल इंगळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रल्हाद नाटेकर, पंजाब नाटेकर, मोहन नाटेकर, विजय नाटेकर, प्रमोद नाटेकर, संतोष साळवे, ज्ञानेश्वर नाटेकर, अनिल नाटेकर, अंकुश नाटेकर, किशोर नाटेकर, शंतनू निकाळजे, शाम घाडगे, ओम दुतोंडे, शुभम नाटेकर,वेदांत साळवे यांच्यासह अनेक युवकांनी विशेष परिश्रम घेतले. महिला भगिनींचाही मोठ्या संख्येने सहभाग लाभला.
जयंती सोहळ्यादरम्यान ग्रामस्थांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि परिवर्तनाचा संदेश दिला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने वाडी ब्रम्हपुरी परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण केले✍️



