बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रविदर्भ

‘अवयवदान-जीवनदान’चा जिल्हाभर जागर; ३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृती पंधरवडा

खमगाव | प्रतिनिधी :

गजानन तांगडे

बुलढाणा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘अवयवदान पंधरवडा’ साजरा करण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ ३ ऑगस्ट रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्साहात झाला. यंदा “अवयवदान – जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” या संकल्पनेवर आधारित विविध जनजागृती उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत.समाजामध्ये अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यासंदर्भातील गैरसमज व अंधश्रद्धा दूर करणे आणि अधिकाधिक नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने समाजहिताच्या या पवित्र कार्यात सहभागी होऊन अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रेय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रवी शिंदे, डॉ. कल्पना इंगळे, डॉ. भिलावेकर, नोडल अधिकारी अविनाश चिंचोले, नेत्रदान समुपदेशक योगेश शिरसाट, डॉ. अमोल उगले, सौरभ हिवाळे, डॉ. देशमुख, स्टाफ नर्स, जिल्हा माहिती, शिक्षण व माध्यम अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा-महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक व धार्मिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती रॅली, शपथविधी, व्याख्याने, चर्चासत्रे, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा, आरोग्य शिक्षण, समाजमाध्यमांद्वारे जनजागृती तसेच अवयवदानावरील यशोगाथा आणि अनुभव कथन यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अवयवदानाचा संकल्प स्वीकारावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button