बुलढाणामहाराष्ट्र

चिखली काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका : प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

चिखली : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्राला आपल्या प्रतिभेने समृद्ध करणारे, शोषित-वंचित समाजाच्या वेदनांना आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी चिखली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या जयस्तंभ चौक येथील जनसेवा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी दोन्ही महान विभूतींच्या सामाजिक, साहित्यिक, राष्ट्रभक्तीपर व लोकजागृतीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, कादंबऱ्या, कथा, लोकनाट्य, पोवाडे आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील अन्याय, विषमता, दारिद्र्य व शोषणाविरोधात प्रभावी आवाज बुलंद केला. उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या जीवनसंघर्षाला त्यांनी आपल्या लेखणीतून न्याय देत सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक व्यापक केली. त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा प्रभाव आजही समाजाला दिशा देणारा असून, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये रुजविण्यात त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

तसेच लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याचा विचार जनतेपर्यंत पोहोचवून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. राष्ट्रप्रेम, शिक्षण, सामाजिक जागृती आणि लोकसंघटन या क्षेत्रातील त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचे स्मरण करून राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

भारतीय राज्यघटनेतील समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना बळकट करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तसेच राष्ट्रसेवा, स्वाभिमान आणि लोकजागृतीसाठी लोकमान्य टिळक यांच्या आदर्शांचे आचरण आजच्या पिढीने करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button