साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना चिखलीत अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
” अण्णाभाऊंचे विचार समाजाला आजही दिशा देणारे – नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय फाउंडेशनच्या पुढाकाराने स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
चिखली जगविख्यात साहित्यिक, लोकशाहीर, साहित्यरत्न, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त चिखली येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय फाउंडेशन व मातंग सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी चिखलीचे नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, उपनगराध्यक्ष पती कपिल खेडेकर, चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे, माजी नगरसेवक गोविंद देव्हडे,युवा नेते भाई छोटु कांबळे, ज्येष्ठ नेते गजानन पवार, सिद्धेश्वर ठेंग, मंगेश ठेंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख म्हणाले, “अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून अन्यायाविरोधात बुलंद आवाज निर्माण केला. ‘फकिरा’ ही केवळ कादंबरी नसून सामाजिक क्रांतीची मशाल आहे. त्यांच्या समतेच्या, शिक्षणाच्या आणि संघर्षाच्या विचारांचा वारसा समाजाने पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
या कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
कार्यक्रमास युवा सेना चिखली शहरप्रमुख राजेश पवार,सत्यशोधक अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे उपाध्यक्ष दिलीप काळे, सचिव कृष्णा साळवे,कोषाध्यक्ष✍️



