महाराष्ट्रविदर्भ

मालमत्ता कर वाढ रद्द झाल्याची अधिकृत घोषणा करा; काँग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

चिखली नगर परिषदेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या अवाजवी व जनविरोधी ‘गब्बर सिंग’ मालमत्ता कर वाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून श्रेय घेण्यापेक्षा नगर परिषद प्रशासनाने अधिकृत आदेश काढून कर वाढ रद्द झाल्याची घोषणा करावी, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघु व्यावसायिक, नोकरदार, मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांवर ही प्रस्तावित कर वाढ अन्यायकारक असून सुरुवातीपासूनच काँग्रेसने या जनविरोधी निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. नागरिकांच्या हितासाठी हा लढा सातत्याने सुरू ठेवण्यात आला असून प्रशासनाने जनभावनेचा आदर करून कर वाढ अधिकृतपणे रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय नेते व कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर “कर वाढ रद्द झाली” अशा पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. मात्र, आजपर्यंत नगर परिषद प्रशासनाकडून कोणताही अधिकृत आदेश, परिपत्रक किंवा अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जर कर वाढ खरोखरच रद्द झाली असेल, तर अधिकृत आदेश काढण्यास विलंब का? आणि जर कर वाढ अद्याप रद्द झालेली नसेल, तर नागरिकांना हरकती दाखल करण्यासाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी.

काँग्रेसने प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, नागरिकांवर अन्याय करणाऱ्या कोणत्याही निर्णया✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button