कुऱ्हा-जोंधनखेडा धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला गती; आमदार एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय हालचालींना वेग

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-जोंधनखेडा धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर असूनही प्रलंबित असल्याचा मुद्दा आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत अतारांकित प्रश्न उपस्थित करून मांडला होता. यावर सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा मंत्री यांनी या कामाची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे.
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत माती धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले असून, सांडव्याची उंची वाढवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सांडव्याचे काम करताना पायाची पातळी सुमारे १.५ मीटर अधिक खोल गेल्याने खोदाई आणि संधानकामाच्या परिमाणात वाढ झाली आहे. या वाढीव कामासाठी ‘तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता’ घेण्याची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असून, आमदार खडसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पातील मुख्य कालव्याचे १.८० कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित वितरण प्रणालीचे काम पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे.




