बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक

ICI Education :NEET बदलत्या आव्हानांवर मात! ‘आय.सी.आय. एज्युकेशन’ची तनुजा मोगल ठरली यशाचे प्रेरणास्थान!

फुके सर यांची आय. सी.आय क्लासेस ठरतोय डॉक्टर बनवण्याची फॅक्टरी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी– शंकर शिवरकर

कौटुंबिक आणि परीक्षांच्या दडपणाला न जुमानता मिळवले नेत्रदीपक यश.

देऊळगाव राजा;–आय.सी.आय एज्युकेशन,या क्लासेसचे संस्थापक आणि प्रमुख मार्गदर्शक विनायक फुके सर (Vinayak Fuke Sir) आहेत. ते स्वतः एक अनुभवी शिक्षक आणि करिअर मार्गदर्शक आहेत.
सध्याच्या बदलत्या व स्पर्धात्मक युगात कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देऊन ध्येय गाठता येते, हे फुके सरांचे, ‘आय.सी.आय. एज्युकेशन’ (ICI Education) क्लासचे विद्यार्थी तनुजा मोगल हिने सिद्ध केले आहे. विविध प्रकारच्या तणावांचा सामना करत तिने NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिची ही कामगिरी आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श ठरली आहे.

पहिल्या टप्प्यात ६५०, तर

Re-NEET मध्ये ५८५ गुण

देऊळगाव राजा येथील एका सामान्य कुटुंबातील मुलीने सिद्ध करून दाखवले आहे. शहरात स्कूल बस चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका कष्टकरी वडिलांची कन्या कु. तनुजा किशोर मोगल हिने NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन करत डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे भक्कम पाऊल टाकले आहे. अत्यंत कठीण आणि दडपणाच्या परिस्थितीतही तिने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पैशांच्या अभावावर मात करत मिळवले यश

दहावीचा निकाल लागल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तनुजासोबतच्या इतर हुशार विद्यार्थिनी मोठ्या शहरांमध्ये महागड्या शिकवणीसाठी गेल्या. मात्र, पैशांच्या अभावामुळे तिचे वडील किशोर मोगल यांना तिला बाहेरगावी पाठवणे शक्य झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने तिला देऊळगाव राजा येथेच शिक्षण घ्यावे लागले. मात्र, स्थानिक पातळीवर
‘आय.सी.आय. एज्युकेशन’ (ICI Coaching Classes) चे संचालक फुके सर यांनी तनुजामधील गुणवत्ता ओळखून तिला मोलाचे मार्गदर्शन केले.
कठोर परिश्रमांना संयमाची जोड दिली तर अशक्य असे काहीच नाही” असं कान मंत्र फुके सर यांनी दिला.
Re-NEET च्या दडपणातही दाखवली जिद्द

NEET च्या पहिल्या टप्प्यात (Phase-1) तनुजाने ७२० पैकी ६५० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे परीक्षा पुन्हा (Re-NEET) घेण्याचा निर्णय झाला. या मानसिक दडपणाखाली अनेक विद्यार्थी खचले; परंतु फुके सरांनी दिलेल्या मानसिक आधारामुळे तनुजाने पुन्हा जिद्दीने परीक्षा दिली आणि Re-NEET मध्येही ५८५ गुण मिळवत आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली.

“मी एक साधा स्कूल बस चालक आहे. मुलीला मोठ्या शहरात शिक्षणासाठी पाठविण्याइतके पैसे नव्हते, त्यामुळे मनात नेहमी खंत वाटायची. पण आज निकाल लागल्यानंतर कळले की, बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही माझी तनुजा पुढे निघून गेली आहे. फुके सरांनी माझ्या गरिबीला कधीच अडथळा होऊ दिला नाही. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज माझ्या लेकीने माझे स्वप्न पूर्ण केले,” अशी भावूक प्रतिक्रिया तनुजाचे वडील किशोर मोगल यांनी व्यक्त केली.

देऊळगाव राजाच्या मातीतूनही डॉक्टर घडतात : फुके सर

या यशाबद्दल बोलताना आय.सी.आय. एज्युकेशनचे संचालक फुके सर म्हणाले, “यश हे मोठ्या शहरांतील महागड्या फीवर अवलंबून नसून विद्यार्थ्यांची जिद्द, मेहनत आणि शिक्षकांचा विश्वास यावर अवलंबून असते. गुणवत्ता आणि चिकाटी असेल तर देऊळगाव राजासारख्या ग्रामीण भागातूनही तनुजासारखे डॉक्टर घडू शकतात. हे या विद्यार्थिनीने सिद्ध करून दाखवले आहे. तिचा हा विजय आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक आहे.”

तनुजा किशोर मोगल हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण देऊळगाव राजा तालुक्यातून तिच्यावर तसेच ‘आय.सी.आय. एज्युकेशन’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मार्गदर्शन: फुके सर हे प्रामुख्याने बोर्ड (Board), JEE, NEET आणि फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
इतर शिक्षक: त्यांच्या क्लासेसमध्ये भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Maths)/जीवशास्त्र (Biology) या विषयांसाठी तज्ज्ञ आणि उच्चशिक्षित शिक्षकांची टीम आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button