बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

कोलारा गावच्या भूमिपुत्राची विज्ञानविश्वात दमदार भरारी ! चि. निधीश सोळंकीच्या यशाने बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावली,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :- प्रशांत चव्हाण

चिखली – तालुक्यातील कोलारा येथील सुपुत्र तथा पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेणारा चि. निधीश सोळंकी याने अल्पवयातच जागतिक संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. सहकारी अर्णव खापर्डे यांच्या समावेत त्याने भौतिकशास्त्रातील अत्यंत क्लीस्ट समजल्या जाणाऱ्या काँटम ग्रॅव्हिटी’या विषयावर टाईम रेझीस्टन्स थेअरी हा संशोधनात्मक सिद्धांत मांडला आहे,
या संशोधनाची नोंद युरोपियन संशोधन व्यासपीठ ‘झेनेडो तसेच इंटरनॅशनल जर्नल फॉर मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च मध्ये झाली असून, जागतिक वैज्ञानिक समुदायाकडून त्याची दखल घेतली जात आहे, एवढ्या लहान वयात मिळवलेले हे घवघवीत यश खरोखर प्रेरणादायी आहे ,
चि. निधीश हा कोलारा येथील उद्योजक श्री. वसंत सोळंकी व डॉ .कविता सोळंकी यांचा सुपुत्र आहे. ग्रामीण भागातून जागतिक संशोधनाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचत त्याने आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे नावलौकिक केले आहे. चि.निधीश सोळंकी व त्याचा सहकारी अर्णव खापर्डे तसेच दोन्ही कुटुंबाचे मनापासून अभिनंदन त्यांना पुढील शैक्षणिक संशोधनाच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, त्यांच्या या यशातून सर्वच विद्यार्थ्यांना एक मोठी प्रेरणा मिळेल.असा विश्वास आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button