पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याविना त्रस्त बोडखा; सरपंच राहुल उमाळे यांच्या पुढाकाराने टँकरद्वारे पाणीपुरवठा…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- १७ जुलै २०२६
ग्रामस्थांना दिलासा प्रत्येक वस्ती पर्यंत टँकर पोहोचवून पाण्याचे वाटप संग्रामपूर तालुक्यातील बोडखा या गावात मागील पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. नळयोजना बंद असल्याने आणि नियमित पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत गावचे सरपंच राहुल उमाळे यांनी तातडीने पुढाकार घेत आज संपूर्ण गावासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. सरपंच राहुल उमाळे यांच्या नियोजनामुळे गावातील विविध वस्ती, गल्ली आणि परिसरात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी होणारा त्रास कमी झाला असून ग्रामस्थांनी या तातडीच्या उपाययोजनेबद्दल समाधान व्यक्त केले. उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झालेल्या या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना प्रशासनानेही कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, गावातील पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सरपंच राहुल उमाळे यांनी सांगितल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली…




