श्री स्वामी समर्थ केंद्राच्या 108 महिलांनी केले दुर्गा सप्तशती पठणतुळजाभवानीच्या रावेर तालुक्यातील पहिल्या मंदिराची स्थापना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसरावेर प्रतिनिधी विकास आमोदकर
शहरातील प्रसिद्ध अशा मा बिजासनी मातेच्या देवळात आज १०८ महिलांनी दुर्गा सप्तशती पठण केले. यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या कुलदैवत आदिमाता श्री. तुळजा भवानी मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
रावेर शहरातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावरील सावदा रोडवर मा बिजासनी मातेचे बऱ्याच वर्षांपासून मंदिर आहे. येथे पूर्वीपासूनच भक्ती भावाने मातेची आराधना केली जाते. आता त्याच मंदिरात देवी आदिमाता तुळजाभवानी मातेची भर पडली आहे. बिजासनी मातेच्या या मंदिराचे उद्घाटन इंग्रजी कॅलेंडर नुसार दि. २४/०६/८७ रोजी झालेली होती.
त्यानुसार मराठी कॅलेंडर व तिथी नुसार बिजासन मातेच्या वर्धापन दिना निमित्त मातेच्या मंदिरातच आदिमाता तुळजाभवानी मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वैदिक पद्धतीने मंत्रोच्चाराच्या गजरात व सर्व श्लोकांचे पठण करून मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी स्थापनेसाठी पौरोहित्य आचार्य प्रकाश जोशी यांनी केले. ब्रम्हयज्ञ गोपाल दुबे यांनी केले. यांच्यासह संजीव लिमये, संजय मटकरी, हर्शल सावदेकर यांनी सहकार्य केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, माजी नगरसेविका शकुंतला रमेश महाजन, माजी नगरसेवक प्रभाकर बापू महाजन, सुनंदाबाई जीवन महाजन, ललित जीवन महाजन, अपर्णा ललित महाजन, मनीष जीवन महाजन,प्रियंका मनीष महाजन, अमोल कलेश महाजन,पंकज कलेश महाजन, प्रतीक महाजन , सुधाकर चौधरी यांच्यासह आदी भक्त उपस्थित होते.
शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.



