बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
बुलढाणा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दोन कार्यक्षम अधिकाऱ्यांची बदली नागरिकांमध्ये चर्चेला उधान!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
बुलढाणा दि.९/७/२६. सविस्तर वृत्त असे की बुलढाणा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अत्यंत कार्यक्षम आणि लोकप्रिय असलेले दोन अधिकारी विवेक भंडारे आणि नागनाथ महाजन यांचे प्रशासकीय कारणास्तव बदली झाली आहे. आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि पारदर्शक कामकाजामुळे विवेक भंडारे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक आणि वाहनधारकांची मन जिंकली होती. आणि आता त्यांची बदली चाळीसगाव येथे झाली आहे. तसेच नागनाथ महाजन यांची जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे बदली करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे बुलढाणा आरटीओ कार्यालयातील एक कार्यक्षम पर्व संपले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस कर्मचाऱ्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



