प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे हीच राष्ट्रीय जबाबदारी; आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
पल्स पोलिओ अभियानातून जनजागृती; प्रत्येक बालकाच्या सुरक्षित भविष्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावाराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात सहभागी होत मा. आमदार श्री. चंद्रकांतभाऊ पाटील यांनी पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून अभियानाचा शुभारंभ केला. देश कायमस्वरूपी पोलिओमुक्त राहावा आणि प्रत्येक बालकाचे आरोग्यदायी, सुरक्षित भविष्य घडावे, यासाठी हे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील यांनी प्रत्येक पालकाने आपल्या परिसरातील पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत आणि राष्ट्रीय जनआरोग्य मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. “निरोगी बालक, सुदृढ कुटुंब आणि सक्षम भारत” हे ध्येय साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज भाऊ राणे, शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोळी, माजी नगरसेवक निलेश शिरसाट, चंद्रकांत मराठे, शिवसेना अनुसूचित जाती-जमाती तालुकाध्यक्ष राजूभाऊ वानखेडे यांच्यासह शिवसेना-युवासेना परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे आवश्यक आहे. “दोन थेंब जीवनाचे… प्रत्येक बालकाच्या सुरक्षित उद्यासाठी” हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता प्रत्येक पालकाची जबाबदारी बनला, तरच भारत पोलिओमुक्त राहण्याचा संकल्प अधिक बळकट होईल.



