खानदेशबुलढाणामहाराष्ट्र

जम्मू-काश्मीरच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करतानाशहीद स्व. अंकुश महादेव मिसाळ यांना वीरगती प्राप्त केलेले .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:– शंकर शिवरकर

देऊळगाव राजा तालुक्यातील: मेहुणा राजा या गावातील ,भारतीय सेनेचे शूर जवान मेहुणा राजाचे सुपुत्र अंकुश माधव मिसाळ ये देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपली प्राण्याची सर्वोच्च बलिदान दिले
आज मिसाळ परिवारावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे
सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बाजवत असताना जवान अंकुश मिसळ यांनी मातृ भूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिले त्यांच्या बलिदानामुळे
अभिमानाची भावना निर्माण झाली असली तरी या दुःखात घटनेने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे
कर्तव्य आणि देश सेवेचे प्रबळ भावना बाळगणारे जवान म्हणून परिचित होते त्यांच्या निधनामुळे मिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण तालुका मधून शोक वेदना व्यक्त केला जात आहे
शहीद जवान अंकुश यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी मेहुणा राजा येथे आणण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या अंतिम संस्कार साठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी हजारो नागरिक उपस्थित राहणार आहे
शहीद झालेले बातमी गावात पोहोचताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली गावातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते आपल्या गावातून घडलेला वीर पुत्राने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता
​जम्मू-काश्मीरच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करताना वीरगती प्राप्त केलेले भारतीय सैन्याचे शूर जवान, मेहुणा राजाचे सुपुत्र अंकुश महादेव मिसाळ
​देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे हे अतुलनीय शौर्य, अदम्य साहस आणि सर्वोच्च बलिदान संपूर्ण देश सदैव स्मरणात ठेवेल. भारतीय सैन्यातील अशा शूर जवानांमुळेच आज आपण सुरक्षित आहोत. शहीद अंकुश मिसाळ यांचे समर्पण तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणास्थान राहील.
​आज मिसाळ परिवारावर कोसळलेला दुःखाचा डोंगर अत्यंत वेदनादायी आहे.
वीरपुत्र अंकुश यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर बळ देवो.
​अमर हुतात्म्याला विनम्र अभिवादन!
​जय हिंद! जय भारत!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button