बुलढाणामहाराष्ट्र

घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते रखडल्याने बांधकाम अर्धवट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यात शासनाच्या विविध घरकुल योजना अंतर्गत मंजूर झालेल्या शेकडो गरीब व गरजू लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते अनेक महिन्यापासून रखडले असल्यामुळे ग्रामीण भागात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गरीब कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा, या उद्देशाने शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांना निधी वेळेवर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांचे घरकुल बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे. या गंभीर प्रश्नावर आवाज उठवत शेतकरी आंदोलक प्रकाश भाऊ भिसे यांनी जिल्हा परिषद बुलढाणा तेथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले की. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, यासारख्या विविध घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे पहिला व दुसरा व तिसरा व चौथा हप्ता मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. हप्ते वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अर्धवट अवस्थेत पडून आहे. अनेकांनी खाजगी सावकारांकडून व नातेवाकाकडून उसनवारी पैसे घेऊन व बँकेकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले, मात्र शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. गरीब कुटुंबांना घर देण्याचा शासनाचा उद्देश असताना प्रत्यक्षात शासनातील विलंबामुळे लाभार्थी आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करत आहे. याशिवाय पंचायत समिती जळगाव जामोद येथे नुकतेच नियुक्त झालेल्या गटविकास अधिकाऱ्यांचे डी एस सी अध्याप आक्टिव्ह झालेले नसल्यामुळे अनेक फायली, मंजुरी प्रस्ताव, घरकुल हप्ते मंजुरी प्रक्रिया आणि निधी वितरण पूर्णपणे रखडले आहे. त्यामुळे प्रशासनातील तांत्रिक कारणाचा फटका थेट गरीब लाभार्थ्यांना बसत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. निवेदन सादर करताना अशपाक देशमुख साहेब, कार्तिक राऊत, राजेंद्र परिहार आणि विलास दातीर, यांनी या मागण्यांना पाठिंबा देत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली. अन्यथा लोकशाही मार्गाने जण आक्रोश आंदोलन जळगाव जामोद तालुक्यात येथे करण्यात येईल असा इशारा प्रकाश भाऊ भिसे यांनी प्रशासनाला दिला आहे
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button