बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा; तहसील कार्यालयावर सिंदखेड राजा धडक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी चिखली :-सलमान पठाण

दिनांक २२/०६/२०२६
सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : शेतकऱ्यांची बिनाअट व बिनाशर्त संपूर्ण कर्जमुक्ती, प्रलंबित पीक विमा तसेच ठिबक व तुषार सिंचन अनुदान तातडीने मंजूर करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालय, सिंदखेड राजा येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मोर्चादरम्यान शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबनभाऊ बोडखे, तालुकाप्रमुख आत्माराम शेळके, सिद्धेश्वर आंधळे, शहरप्रमुख उल्हास भुसारे, महसाजी वाघ, रणजित मासमत, अभिलाप मोगल, रमेश पालवे, मुरली शिंगणे, प्रशांत जयभये यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button