बुलढाणामहाराष्ट्र

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने खामगाव येथे निषेध आंदोलन

जीडी रोकडे बुलढाणा प्रतिनिधी
खामगाव : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून बदर समिती मार्फत अनुसूचित जाती मार्फत आरक्षण विरोधी षडयंत्र रचले जात आहे. घटनात्मक दृष्टीने अखंड असलेल्या अनुसूचित जातीत विभागणी करून वाद व भांडणे लावण्याचा हा मनुवादी व्यवस्थेचा घाट आहे. शासनाच्या हालचालींविरोधात तीव्र भूमिका घेत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, खामगाव यांच्या वतीने सोमवार, दिनांक 22 जून 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता खामगाव येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आंदोलनात अनुसूचित जातीतील 59 जातीतील सर्व घटक, सर्व आंबेडकरी संघटना, सर्व चर्मकार संघटना, मेहतर व खाटीक संघटना सहभागी होणार आहे. अनुसूचित जातीतील आरक्षणाचे वर्गीकरण करून जाती जातीत मत भिन्नता होणार आहे तसेच वाद व भांडण हाणून पाडण्यासाठी सर्वच अनुसूचित जातीची एकीकरण आवश्यक आहे, अशी भूमिका उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने घेतली आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने आरक्षण प्रेमिनी सहभागी व्हावे असे आवाहन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समानता आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी मिळवून दिलेले घटनात्मक आरक्षण हे अनुसूचित जाती समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन आहे. या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांना बाधा पोहोचवणारा असल्याची भावना समाजामध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे या विषयावर समाजाची भूमिका शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

मोर्चाची सुरुवात खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक येथून होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी शासनाला निवेदन सादर करून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण न करण्याची तसेच संबंधित समितीच्या अहवालास मान्यता देऊ नये, अशी मागणी करण्यात येणार आहे.

या आंदोलनामध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा कार्यक्रम नसून, अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटक, युवक, महिला, विद्यार्थी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे……

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button