तेल्हारा माळेगाव मेन रोडवरील आजूबाजूच्या नालिचे बांधकाम ठप्प

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
संतोष गिऱ्हे
तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार मेन रोड परिसरातील नालीचे बांधकाम न केल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा बाधित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
माळेगाव येथील रहिवासी व व्यापारी यांनी मेन रोडवरील नाली बांधकामाची तक्रार द्यायची तरी कुठे असा प्रश्न बस स्टँड वरील दुकानदार व व्यापारी वर्ग यांना पडला आहे
पावसाळा सुरु झाल्यानंतर रोडवरील पावसाचे पाणी रोडच्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाण्याची शक्यता आहे. हे काम असेच ठप्प राहिल्यास पाण्याचा निचरा अडथळित होऊन हे पाणी आजूबाजूच्या दुकानांमध्ये साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, माळेगाव बाजार येथील बस स्टँड वरील रोडच्या आजूबाजूच्या
नालीच्या बांधकामांची संबंधित ठेकेदारांनी नोंद घ्यावी अन्यथा माळेगाव बाजार येथील व्यापारी वर्ग हा रस्त्यावर उतरणार आहे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून घ्यवी. ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावातील व्यापारी वर्ग करत आहे.



