बुलढाणामहाराष्ट्र

मेव्हणाराजा रोडवर 3 लाखांहून अधिक किमतीचा अवैधरित्या देशी दारूचा साठा जप्त; 4 तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

देऊळगाव राजा | प्रतिनिधी:– शंकर शिवरकर

देऊळगाव राजा पोलिसांनी मोठी कारवाई करत मेव्हणाराजा-राजा रोडवरील नाकाबंदी दरम्यान एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारा तब्बल 3 लाख 25 हजार रुपयांचा देशी दारूचा साठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून वाहनासह एकूण 3 लाख 75 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून 2026 रोजी 11.45 मीन रात्री देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला मेव्हणाराजा रोडवरून एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सिंनगाव जहागीर ,मेव्हणाराजा रोडवर नाकाबंदी केली.
दरम्यान, रात्री सुमारे 11.45 वाजण्याच्या सुमारास मेव्हणाराजा येणारी MH-05-AS-6685 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार अडवून तिची तपासणी करण्यात आली. वाहनातील दोघांनी आपली नावे प्रदीप करभारी इंगळे (वय 32). प्रमोद उर्फ बाळू नारायण लताड(वय 20, जब्बार खान बशीर का पठाण वय 35 रा. वाघ्रुळ, ता. जालना जिल्हा जालना) अशी सांगितली.
तपासणीदरम्यान वाहनात देशी दारूचे 180 मिलीचे 336 सिलबंद बॉक्स आढळून आले. या मालाची किंमत 3 लाख 25 हजार 240 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडे दारू वाहतुकीसंदर्भातील कोणताही वैध परवाना नसल्याने त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दारूचा साठा, वाहतुकीसाठी वापरलेले दोन मोबाईल फोन (किंमत 20 हजार रुपये) आणि स्विफ्ट डिझायर कार (किंमत 3 लाख 25 हजार रुपये) असा एकूण 3 लाख 75 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या अवैध दारू तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि पुरवठा साखळीचा शोध घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अवैध दारू विक्री किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ देऊळगाव राजा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.
ही कारवाई पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी, यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. राम गिते, पोहेकॉ. माधव कुटे, पोहेकॉ. भास्कर सानप आणि चालक पोहेकॉ. सुभाष मुंडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button