बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

योगातून आरोग्य, आरोग्यातून समृद्धी…

आ. श्वेता महाले, श्री विद्याधर महाले यांच्या उपस्थितीत चिखलीमध्ये योग दिन उत्साहात साजरा…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली: प्रतिनिधी
अरुना दत्तात्रय खंडागळे

निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी नगरपरिषद चिखलीचे नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख, तहसीलदार विजय सवडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. योगाचार्य दिलीप परिहार, डॉ. पृथ्वीराज तसेच श्रीमती वडाळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी सामूहिक योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.

याप्रसंगी आमदार श्वेता महाले पाटील यांनी योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी, सुसंस्कृत आणि सशक्त समाज घडविण्याची जीवनशैली असल्याचे सांगितले. शारीरिक आणि मानसिक आरोग्य संवर्धनासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनीही योगामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योग प्रभावी साधन ठरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे भारतीय योग परंपरेला जागतिक मान्यता मिळाल्याचा अभिमान व्यक्त केला. योगाच्या माध्यमातून ‘निरोगी भारत, सक्षम भारत’ या संकल्पनेला बळ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तालुका प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, तालुका क्रीडा संकुल समिती आणि विविध योग संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला…✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button