बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

फोर्टेस तिकीट तपासणी भुसावळ रेल्वे विभागात विशेष मोहीम!!!४.७१ लाखाहून अधिक दंड वसूल! एकूण ६८३ प्रकरणावर कारवाई!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
दि.२०/६२६.(शेगाव) सविस्तर वृत्त असे की मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत प्रवाशांना सुरक्षित सुलभ व आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तसेच अनधिकृत व विना तिकडे प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने १७ जून २०२६ रोजी विशेष फोर्टिसतिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. ही विशेष मोहीम विभागातील आठ प्रमुख स्थानकावर राबवण्यात आली आहे. यामध्ये भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड , खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती येथे एकाच वेळी राबवण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रवाशांना वैद्य तिकडे देऊन प्रवास करण्यास प्रोसेस करणे तसेच अनधिकृत प्रवासावर प्रभावी नियंत्रण प्रस्तावित करणे हा होता. या सगळं तपासणी मोहिमेत मुख्य वाणिज्य निरीक्षक, मुख्य तिकीट निरीक्षक, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक तसेच वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांसह एकूण ५७ कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बल चे आठ कर्मचारी सहभागी झाले. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान एकूण ६८३ प्रकरणावर कारवाई करण्यात आली असून ४,७१२४५ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे अधिनियमाच्या कलम १४५(ब) अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविण्याविषयी संबंधित २१ प्रकरणामध्ये कारवाई करून तब्बल ३,३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या ४ विक्रेत्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध प्रकरणे नोंदविण्यात आले आहेत. भुसावळ विभाग सर्व प्रवाशांना आवाहन करतो की त्यांनी वैद्य तिकीट घेऊन जबाबदारी नियमांचे पालन करून प्रवास करावा जेणेकरून गैरसोय व दंड टाळता येईल. अशी माहिती संबंधित रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button