तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सतीश इंगळे यांचे भव्य स्वागत!

तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सतीश इंगळे यांचे भव्य स्वागत!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय मनोहरराव घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
दि.१६ जून |
नुकतेच तेल्हारा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संतोष विश्वनाथ इंगळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारला आहे . यानिमित्य त्यांचा तेल्हारा शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तेल्हारा नगर परिषदेचे नगर उपाध्यक्ष तथा नगरसेवक सचिन तायडे, रामेश्वर हागे, तारूशेठ पालीवाल, सरपंच रुपेश राठी, मंगेश सोळंके, बघन भाऊ, रुपेश चव्हाण, जितु राठी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक सतीश इंगळे यांचा भव्य सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
आपल्या कार्यकाळात तेल्हारा शहराची कायदा व सुव्यवस्था अधिक सुदृढ होवो आणि जनसामान्यांना सुरक्षिततेचा विश्वास मिळो अशी अपेक्षा उपस्थितानी याप्रसंगी व्यक्त केली.



