जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

रावेर तालुक्यातील वाघोड परिसरातील अवैध दारू विक्रीचा धुमाकुळ …… प्रशासन मात्र मौनात नागरीकांत संताप सवाल? रावेर तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता प्रतिनिधी विनोद तायडे

वाघोड परिसरातील सध्या अवैध रित्या खुलेआम दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असुन सुद्धा दिवसा ढवळ्या गावामध्ये दारुची उघड -उघड विक्री होत असतांना दिसत आहे मात्र संबंधित पोलिस प्रशासन व दा रुबंदी विभागाचे अधिकारी मात्र याकडे डोळे झाक करीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे

अवैध दारु मुळे परिसरात मद्यपिंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, शिवागाळ , भांडणे , परिसरातील तरुणाई तसेच आल्पवयीन मुलेही दारुच्या आहारी जाऊ लागली आहेत

सामाजिक स्तरावर याचे गंभीर दिसून येत असुन संपूर्ण गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे व तसेच गाव परिसराती ल दारुची सर्रास विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे

अशा प्रकारे दारू विक्री होत असणे हे केवळ कायद्याला झुगारुण देणेच नव्हे तर समाजाच्या ढासळत्या स्थितीचे स्पस्ट चित्र आहे

स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार गावातील काही ठराविक ठिकाणी दिवसभर व रात्री उशिरा पर्यन्त दारु उपलब्ध होत आहे तर विशेष म्हणजे काही विक्रेते घरगुती पातळीवर हा व्यवसाय करीत असल्याचेही समोर येत आहे

याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित पोलिस प्रशासन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र अद्याप कोण तीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तिव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे

दरम्यान या प्रकारामुळे गाव परीसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक स्तरावर जसे की कौंटुबिक वाद, भांडणे, आणी आर्थिक अडचणी मध्ये हि वाढ होत असल्याचे दिसून येत आहे

….. कारवाईची मागणी ……

गावातील अशा प्रकारे चालणाऱ्या अवैध धंद्यांना आता आळा बसणे गरजेचे आहे

वाघोड येथे पंधरा ( 15 ) वर्षापूर्वी ग्राम पंचायत अंतर्गत ग्रामसभा घेऊन गावामध्ये कुठल्याही प्रकारची दारु विक्री होणार नाही याकरी ता संपूर्ण गावकऱ्यांनी ग्राम पंचायत मध्ये आडवी बातमी उभी बाटली ठेवुन गावातील पुरुष व महिला वर्ग यांनी गावातील दारु दुकान परवाना कायम स्वरूपी बंदी साठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असुन तरी सुद्धा संबंधित पोलिस प्रशासन व दारुबंदी विभागाने या कडे गार्थियतेने लक्ष दिले नाही या वरुण असे समजले जात आहे की वाघोड येथे दारु विक्री मात्र कोनाच्या आशिर्वादाते चालत आहे ? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे

तरी लवकरात लवकर हे धंदे बंद न झाल्यास अन्यथा नागरीक कठोर आंदोलन उभारतील असा ईशारा हि सामाजिक कार्यकर्ते अनिल पुंडालिक मशाने व ग्रामस्थांनी दिला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button