बुलढाणामहाराष्ट्र

स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाला मानवंदना; शिवराज्याभिषेक दिन साजरा….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ६ जून २०२६
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेची कैवारी पराक्रम, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या युगपुरुष रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना उजाळा देत. राज्याभिषेक सोहळ्याची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक क्षण स्मरणात ठेवत गट ग्रामपंचायत काथरगावच्या वतीने गुढी उभारण्यात आली. स्वराज्याच्या वैभवशाली परंपरेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या गुढीचे पूजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. यावेळी उपस्थितांनी शिवरायांच्या शौर्य, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी विचारांचा जागर केला. छत्रपतींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी विचारांचा जागर केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त आदर्श सरपंच सुवर्णाताई गणेश टापरे होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रियाताई गोल्हर, लीलाताई मुंडे, विलासभाऊ कंकाळ यांच्यासह अंगणवाडी सेविका अलकाताई खराटे, स्वातीताई गोल्हर, अंगणवाडी मदतनीस ज्योतीताई कंकाळ, सुलोचनाताई मुंडे, आशा सेविका पुष्पाताई कंकाळ, निर्मलाबाई मुंडे, जयश्रीताई कंकाळ, रोजगार सेवक देविदास मेहंगे, शिपाई रमेश हातेकर, सुरेश खराटे, रोशन भोंगळे तसेच ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत समाजहित, राष्ट्रप्रेम आणि लोकसेवेची भावना जोपासण्याचा संकल्प व्यक्त केला.शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाने शिवरायांच्या विचारांचा जागर करत नव्या पिढीला प्रेरणेचा संदेश दिला. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक स्मृतिदिन नसून स्वाभिमान, न्याय, सुशासन आणि जनकल्याणकारी राज्यव्यवस्थेची प्रेरणा देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य हे सर्वसामान्यांच्या हिताचे होते. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत असून, त्याच विचारांचा वारसा जतन करण्याचा निर्धार उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. शिवरायांचे विचार हे केवळ इतिहासाचे पान नसून, ते समाजाला दिशा देणारे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा वारसा जपणे हीच खरी शिवराज्याभिषेक दिनाची कृतज्ञ अभिवादनाची भावना आहे.”शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता, शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते….’ या वचनाचे स्मरण करण्यात आले. जनकल्याण, न्याय आणि प्रगती हीच स्वराज्याची खरी ओळख असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button