बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत सावणा गावचा सुपुत्र किरण पवार इंडियन आर्मीत; जिद्द, संघर्ष आणि चिकाटीचा प्रेरणादायी विजय….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
चिखली:- ६ जून २०२६
सावणा गावातील बौद्ध समाजातील युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशसेवेचे स्वप्न केले साकार सावणा गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र आत्मसात करून सावणा गावातील सुपुत्र किरण संजय पवार यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर इंडियन आर्मीमध्ये निवड होण्याचा मान मिळवला आहे.
आता प्रत्येक पाऊल देशसेवेसाठी झेपावणार,आणि सावणा गावाचा तिरंगा अभिमानाने फडकवणार..!
त्यांच्या या यशामुळे सावणा गाव, बौद्ध समाज तसेच संपूर्ण परिसराचा अभिमान उंचावला आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या किरण पवार यांनी अनेक अडचणी, आर्थिक संकटे आणि कठीण परिस्थितीचा सामना करत कधीही आपल्या ध्येयापासून माघार घेतली नाही. दिवस-रात्र मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि देशसेवेची प्रबळ इच्छा यांच्या जोरावर त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचा त्याग, स्वतःची मेहनत आणि बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. आजच्या काळात अनेक युवक विविध मोह आणि चुकीच्या मार्गांकडे वळताना दिसतात. अशा परिस्थितीत किरण पवार यांनी आपल्या कृतीतून युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या यशामुळे समाजातील अनेक तरुणांना नव्या उमेदीने स्पर्धा परीक्षा, सैन्य भरती आणि विविध क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळणार आहे. किरण पवार यांची इंडियन आर्मीतील निवड ही केवळ एका युवकाची यशोगाथा नसून संघर्षावर मात करून उभ्या राहिलेल्या नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचा विजय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वाभिमान आणि शिक्षणाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत किरण यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.स्वतःसाठी नव्हे, आता देशासाठी जगणार,
भारतीय सैन्याचा जवान म्हणून इतिहास घडवणार…! शुभेच्छुक
मुकिंदा गव्हांदे प्रतिनिधी, जळगाव जामोद रतन भगत प्रतिनिधी, संग्रामपूर कष्टांची होती तलवार, जिद्दीची होती धार, बाबासाहेबांच्या विचारांनी दिला यशाचा आधार.
गावाचा वाढविला अभिमान, केला देशसेवेचा स्वीकार, भारतीय सैन्यात निवड होऊन चमकला किरण पवार! यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा….✍️



