खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही” – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आ. चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

कुऱ्हा परिसरातील नुकसानग्रस्त केळी बागांची आ. चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी; तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील चिचंखेडा बु., निमखेडी बु., इच्छापूर, टाकळी, महालखेडा व चारठाणा या गावांमध्ये १ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

नुकसानाची तीव्रता लक्षात घेऊन आ. पाटील यांनी तात्काळ जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी तहसीलदार वखारे, कृषी विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेला १०० टक्के पंचनामे करण्याचे निर्देश देत कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले.

तसेच पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानीनुसार योग्य भरपाई मिळावी, ऑनलाईन प्रक्रियेमुळे वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा यासाठी शासन आणि विमा कंपनी स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. पाटील यांनी दिले.

“शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून संकटाच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे आ. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात तालुकाप्रमुख नवनीत पाटील, उपतालुका प्रमुख शिवाजी पाटील, सतीश नांगरे, सूर्यकांत पाटील, नरेंद्र पाटील, गणेश थेटे, संतोष जमाव, राहुल बगे, भूषण पाटील, आकाश पाटील यांच्यासह अनेक शेतकरी, कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button