बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अंगावर भिंत कोसळल्याने एक युवक व एक वृद्ध ठार.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी- प्रशांत चव्हाण
बुलढाणा-पिंपळगाव राजा येथे अंगावर भिंत कोसळून एक युवक व एक वृद्ध या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना 28 मे रोजी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान पिंपळगाव राजा येथे घडली, या घटनेने परिसरात हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठेकेदार अहमद खान यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. बांधकाम सुरू असताना अचानक एक भिंत कोसळली बांधकामावर असलेले मजूर मुकद्दर खान वय 84 वर्ष व शेख युसुफ शेख बिस्मिल्ला वय 35 वर्ष यांच्या अंगावर भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. सदर घटना घडल्याचे लक्षात येताच ठेकेदार अहमद खान यांनी आजूबाजूच्या नागरिकांना व स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
ठेकेदार भागवत मुळीक व पोलीस तसेच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पडलेल्या भिंतीखाली दबलेल्या दोन्ही मजुरांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले मात्र यातील शेख युसुफ शेख बिस्मिल्ला हे जागीच ठार झाले होते, तर मुकद्दर खान यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालय येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुकद्दर खान हे ठेकेदार अहमद खान यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली,पत्नी ,व नातवंड आहेत. तसेच शेख युसुफ हे मावस जावई होते. युसुफ यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी, व भावंड असा परिवार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button