बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
सवना गावातील दोन युवकांची मुंबई पोलीस पदी निवड गावभर आनंदाचे वातावरण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:-
सलमान पठाण चिखली
चिखली
चिखली तालुक्यातील सवना गावातील होतकरू युवकांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री. चंदनशेष क्रीडा मंडळाचे खेळाडू आशिष समाधान दांडगे व परमेश्वर राजेंद्र भुतेकर यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस पदी यश संपादन केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सवना गावाचे नाव उज्ज्वल झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तरुणांनी त्यांच्या यशातून प्रेरणा घेऊन मेहनतीच्या बळावर मोठे ध्येय गाठावे, असा संदेशही यानिमित्ताने दिला जात आहे.
दोन्ही युवकांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.



