कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी. फार्मर आयडी अनिवार्य 20 मे पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण
बुलढाणा – महाराष्ट्र राज्यात दि.14 नोव्हेंबर 2024 पासून ” ग्रिस्टॅक “योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी. फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे,
त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना फार्मर आयडी अद्याप काढलेला नाही. त्यांनी 20 मे पर्यंत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 1.71 कोटी खातेदार असून त्यापैकी 1.32 कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी पूर्ण केली आहे, उर्वरित शेतकऱ्यांनी 20 मे 2026 पूर्वी आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावे, शेतकऱ्यांनी नजीकच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन अथवा स्वतः ग्रीस्टॅक पोर्टलवर पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बियाणे ,खते, औषधे, आधी कृषी निविष्ठा प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे.
फार्मर आयडी नोंदणी संदर्भात काही अडचण असल्यास संबंधित विभागाच्या हेल्पडेस्कसी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती विभागासाठी अजितकुमार गेजगे ( 9657109809 ) पुणे जिल्हा संगीता नावावरे ( 7588509492 ), कोकण विभाग सोनाली वाडेकर ( 9404953518 ) , छत्रपती संभाजी नगर विभाग शितल कौदरे ( 9172319637 ) नागपूर विभाग अजितकुमार गेजगे (9657109809 ) व नाशिक विभाग सोनाली वाडेकर ( 9404953518 ) या वर संपर्क साधावा.



