जळगावा जिल्हापत्रकारमहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर तहसीलचा पुरवठा विभाग ‘रामभरोसे’! दांडीबहाद्दर निरीक्षकांचा पत्रकारांशी उर्मटपणा; हालचाल रजिस्टरचा लपवाछपवीचा खेळ उघड

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):शासकीय कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी नियुक्त केलेले अधिकारी नेमके करतात काय? हा प्रश्न आता मुक्ताईनगर तहसील कार्यालयाबाबत उपस्थित झाला आहे. येथील पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक वारंवार अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारींनंतर, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांना चक्क उर्मट उत्तरांचा सामना करावा लागला. “तुम्ही मला विचारणारे कोण?” अशा शब्दांत संबंधित निरीक्षकांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान केल्याने महसूल विभागात खळबळ माजली आहे.नेमका प्रकार काय?पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची कामे रखडत असल्याची ओरड गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. याची शहानिशा करण्यासाठी पत्रकार कार्यालयात गेले असता, संबंधित अधिकारी जागेवर नव्हते. कर्मचाऱ्यांकडे ‘मुव्हमेंट रजिस्टर’ (हालचाल रजिस्टर) ची मागणी केली असता, “साहेब रजेवर आहेत आणि रजिस्टर कपाटात बंद आहे,” अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.फोन जाताच साहेब ‘प्रकटले’; पण लपवाछपवी कायम!विशेष म्हणजे, कर्मचाऱ्याने साहेबांना फोन करून पत्रकार रजिस्टर मागत असल्याची माहिती देताच, काही मिनिटांतच हे महाशय कार्यालयात हजर झाले. मात्र, तरीही रजिस्टर दाखवण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर रेटून धरल्यानंतर रजिस्टर समोर आले, मात्र त्यात १३ तारखेची कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.”मी छोट्या-मोठ्या नोंदी ठेवत नाही…” – अधिकाऱ्याचा उद्धटपणारजिस्टरमध्ये नोंद का नाही? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, पुरवठा निरीक्षकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. “मला छोट्या-मोठ्या नोंदी ठेवण्याची आवश्य

नाही, तुम्ही मला विचारणारे कोण?” असे उत्तर देत त्यांनी पत्रकारांशी हुज्जत घातली. सरकारी नियमानुसार बाहेर जाताना नोंद करणे बंधनकारक असतानाही, “मला काय समजते ते मला कळते, तुम्ही मला सांगू नका,” अशा शब्दांत त्यांनी आपला अरेरावीपणा सिद्ध केला.कायद्याचा विसर की सत्तेचा माज?शासकीय कामासाठी बाहेर जाताना हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करणे अनिवार्य असते. कर्तव्यावर असताना अपघात किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास ही नोंद पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. मात्र, मुक्ताईनगरच्या पुरवठा निरीक्षकांना या नियमांचे वावडे असल्याचेच दिसून येते. “सकाळी कोर्टात गेलो होतो,” असे समर्थन त्यांनी दिले, मग त्याची नोंद रजिस्टरमध्ये का नव्हती? हा मोठा प्रश्न आहे.वरिष्ठ कारवाई करणार का?एकीकडे सरकार प्रशासनात पारदर्शकता आणण्याच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे मुक्ताईनगर तहसीलमध्ये मात्र अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी पत्रकारांनाच दमदाटी करणाऱ्या अशा मुजोर अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन गेलेल्या पत्रकारांना जर अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्यांचे हाल काय होत असतील? या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.”

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button