आंतरराष्ट्रीयक्राईमखानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हानाशिकमहाराष्ट्र

धक्कादायक खुलासा: भोंदूबाबा अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ 20-50 रुपयांत विक्री? मोठा रॅकेट उघड.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असून, तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या खरातच्या कारवायांची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने नुकतीच पत्रकार परिषद घेत तपासाची सविस्तर माहिती दिली. आतापर्यंत नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही ठिकाणी मिळून एकूण १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ८ गुन्हे हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित असून, उर्वरित प्रकरणे फसवणुकीची असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व गुन्ह्यांपैकी बहुतांश प्रकरणांचा तपास २४ सदस्यीय एसआयटी पथक करत आहे.

तपासात उघड झालेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडित महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर विकले जात असल्याचे समोर आले आहे. आरोपीचे १५ ते १७ अश्लील व्हिडिओ विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल करण्यात आले होते. या व्हिडिओंसाठी २० ते ५० रुपये इतका दर आकारला जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणाला सायबर गुन्ह्याचेही स्वरूप प्राप्त झाले आहे.

याप्रकरणी पीडितांची ओळख उघड करणाऱ्या सोशल मीडिया लिंकविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या व्हिडिओंचा स्रोत, त्यांची विक्री करणारे आणि त्यामागील नेटवर्क याचा शोध घेण्यासाठी सायबर यंत्रणाही सक्रिय झाली आहे.

दरम्यान, अशोक खरातने श्रद्धेचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात आर्थिक संपत्ती जमवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. खरातच्या बँक खात्यांपासून ते मालमत्तेपर्यंत सर्व व्यवहारांची तपासणी केली जात आहे.

तपास यंत्रणांकडून आरोपीच्या कॉल डिटेल्सचीही तपासणी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button