महाराष्ट्रविदर्भ

चिखली येथे झोन स्तरीय संत निरंकारी महिला समागमाचे आयोजन,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी -: प्रशांत चव्हाण

बुलढाणा- जिल्ह्यातील चिखली येथे संत निरंकारी मिशन तर्फे झोन क्रमांक ३६. छत्रपती संभाजी नगर व बुलढाणा अंतर्गत झोन स्तरीय संत निरंकारी महिला समागमाचे आयोजन चिखली येथे करण्यात आले आहे, माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपेने हा समागम. पार पडणार असून महिलांसाठी विशेष सत्संग व प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. हा समागम रविवार दि.१७ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान चिखली येथे आयोजित करण्यात आला आहे,
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प.पू . मनीषाताई चंचलानी (मुंबई ) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे , आयोजकांच्या वतीने सर्व महिला भगिनींनी या सत्संग, व प्रवचनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. समागमानंतर लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून. तसेच या भक्तांना ब्रह्मज्ञान (देवाची ओळख) प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कार्यक्रमासाठी विविध पदाधिकारी, व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभत असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button