जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुका एकता संघटने तर्फे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर(प्रतिनिधी) सोशल मीडियावर इस्लाम धर्म व अल्लाह यांच्या संदर्भात आक्षेपार्ह, अश्लील व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुका एकता संघटनेचे तालुका समन्वयक हकीम आर चौधरी यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 12 मे 2026 रोजी सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंटवरून भोपाल येथील गोविंदपुरा थाना क्षेत्रातील एका व्हिडिओमध्ये मुस्लिम धर्म व अल्लाह यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने सार्वजनिकरीत्या इस्लाम धर्म व अल्लाह यांच्या पवित्र नावाचा अपमान केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना गंभीररीत्या दुखावल्या गेल्या असून दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ, वैमनस्य व तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
सदर प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत धार्मिक भावना भडकविणारे व समाजात द्वेष निर्माण करणारे वक्तव्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीमध्ये “झिरो एफआयआर” चा उल्लेख करत कोणत्याही राज्यातील संज्ञेय गुन्ह्याची नोंद कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये करता येते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित व्हिडिओ पुरावा म्हणून पेन ड्राईव्ह स्वरूपात सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.संबंधित आरोपीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा समाजात तीव्र संताप निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या वेळी हकीम आर चौधरी(समन्वयक मुक्ताईनगर तालुका एकता संघटना) अहमद ठेकेदार (खजिनदार मणियार मशिद ट्रस्ट) आदी समाज बांधव उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button