खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

रावेर तालुक्यातील धामोडी परिसरातील अवैध दारू विक्रीचा धुमाकुळ ……प्रशासन मात्र मौनात नागरीकांत संताप सवाल?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील धामोडी परिसरातील अवैध दारू विक्रीचा धुमाकुळ ……

प्रशासन मात्र मौनात नागरीकांत संताप सवाल? स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

रावेर ता प्रतिनिधी विनोद तायडे

धामोडी परिसरातील सध्या अवैध रित्या खुलेआम दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असुन सुद्धा दिवसा ढवळ्या गावामध्ये दारुची उघड -उघड विक्री होत असतांना संबंधित पोलिस प्रशासन व दासबंदी विभागाचे अधिकारी मात्र याकडे डोळे झाक करीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे परिसरातील तरुणाई तसेच आल्पवयीन मुलेही दारुच्या आहारी जाऊ लागली आहेत सामाजिक स्तरावर याचे गंभीर दिसून येत असुन संपूर्ण गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे व तसेच गाव परिसराती ल दारुची सर्रास विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे अशा प्रकारे दारू विक्री होत असणे हे केवळ कायद्याला झुगारुण देणेच नव्हे तर समाजाच्या ढासळत्या स्थितीचे स्पस्ट चित्र आहेस्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार गावातील काही ठराविक ठिकाणी दिवसभर व रात्री उशिरा पर्यन्त दारु उपलब्ध होत आहे तर विशेष म्हणजे काही विक्रेते घरगुती पातळीवर हा व्यवसाय करीत असल्याचेही समोर येत आहेयाबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित पोलिस प्रशासन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र अद्याप कोण तीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तिव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान या प्रकारामुळे गाव परीसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक स्तरावर जसे की कौंटुबिक वाद, भांडणे, आणी आर्थिक अडचणी मध्ये हि वाढ होत असल्याचे दिसून येत आहे….. कारवाईची मागणी …… गावातील अशा प्रकारे चालणाऱ्या अवैध धंद्यांना आता आळा बसणे गरजेचे आहे व लवकरात लवकर हे धंदे बंदन झाल्यास अन्यथा नागरीक कठोर आंदोलन उभारतील असा ईशारा हि ग्रामस्थांनी दिला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button