डॉ.जगदीश पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश!

मुक्ताईनगर (जळगाव): केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा मानाचा तुरा रोवला आहे. सतत अनेक वर्षांप्रमाणे जगदीश पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदाही ९० % अधिक गुण मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
गुणवंतांची देदीप्यमान कामगिरी
प्रथम क्रमांक : आर्चित भोंबे 93%
द्वितीय क्रमांक: धीरज पाटील 91.20%
तृतीय क्रमांक: ईशान झांबरे 91%
चौथा क्रमांक: सेजल नागे 90.20%
पाचवा क्रमांक: केशवी पराते 89.80 %
सहावा क्रमांक: प्रियंका पाटील 89%
💐 मुख्याध्यापक व संस्थापकांकडून कौतुक 💐
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल बोलताना शाळेचे संस्थापक डॉ. जगदीश पाटील आणि मुख्याध्यापक डॉ . योगेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. “हा निकाल म्हणजे केवळ विद्यार्थ्यांची मेहनत नसून शिक्षक आणि पालकांनी घेतलेल्या अपार कष्टांचे फळ आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
शाळेच्या सर्व स्तरातून, पालक वर्गाकडून आणि मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



