जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरा स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

:- प्रशांत चव्हाण
जळगाव (जा) आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरडकर सर यांची निवड करण्यात आली.
तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केला. महात्मा ज्योतिबा फुले यांचे बालपण, त्यांनी केलेले शैक्षणिक, सामाजिक कार्य, अस्पृश्यांच्या व स्त्रियांच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बिस्किट पुड्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक कुमारी रोहनकर मॅडम, सौ चव्हाण मॅडम, चौधरी सर, या सर्वांनी परिश्रम घेतले व यशस्वी रित्या कार्यक्रम पार पडला.



