बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शासकीय सेवेत असतानाही पदराआडून राजकारण…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

मुख्यमंत्री फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या निलंबनासाठी काँग्रेस महिला पदाधिकारी आक्रमक !

चिखली :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले  हे सरकारी सेवेत असतानही भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये उघडपणे तसेच अप्रत्यक्षपणे सहभागी होत आहेत. यामुळे प्रशासनाची निष्पक्षता धोक्यात येत असून, सरकारी यंत्रणा पक्षीय कामासाठी वापरली जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आदर्श आचारसंहितेचा विद्याधर महाले यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात वारंवार भंग केला आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्या पदराआडून राजकारण करणाऱ्या विद्याधर महाले यांच्यावर निलंबनाची तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महिला काँग्रेस पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर चिखली येथे रविवार ५ एप्रिल रोजी निषेध आंदोलन करत,  निलंबित करा.. निलंबित करा .. विद्याधर महाले यांना निलंबित कराच्या घोषणांनी महिलांनी परिसर दणाणून सोडला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते, विद्याधर महाले हे शासकीय पदावर असतानाही दमदाटीचे राजकारण करत आहे. सामान्य नागरिकांना धमकावणे, कामे मुद्दाम खोळंबून ठेवणे आणि राजकीय सूडबुद्धीने त्रास देण्यात त्यांनी उच्चांक गाठला आहे. सरकारी अधिकाऱ्याने अशा प्रकारे वागणे अत्यंत गंभीर असून, हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.  महिला पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारला आम्ही जाब विचारू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

विद्याधर महाले हे सरकारी अधिकारी की भाजपचे प्रचारक ?

विद्याधर दयासागर महाले हे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव असून ते चिखली आमदार श्वेता महाले यांचे पती आहे. ते शासकीय कर्मचारी असून अनेक वर्षापासुन प्रतिनियुक्तीवर मंत्रालयात कार्यरत आहे. त्यांना महाराष्ट्र कर्मचारी सेवा नियम (वर्तवणुक) १९७९ लागू आहे. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची आदर्श आचार संहिता वर्षभरासाठी लागू असते.

कुटुंबातील कुठल्याही सदस्याला तुमच्या शासकीय पदाचा प्रत्यक्ष तर नाहीच पण अप्रत्यक्ष पण फायदा होता कामा नये असे अत्यंत स्पष्ट तरतूद त्या मध्ये असतानाही विद्याधर महाले हे भाजपाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये खुलेआम उपस्थिती लावून सरकारी नियमांची पायमल्ली करत आहे. शनिवार व रविवार चिखलीत मुक्काम ठोकून शासकीय कर्मचाऱ्यांच्या तथा भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच त्यांच्या पदाचा दुरुपयोग करुन ते पत्नी व भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्या राजकारणाला फायदा होईल यासाठी अनेक नागरिकांवर त्यांच्या पदाच्या माध्यमातून दबाबतंत्र राबवत आहेत. विद्याधर महाले हे सरकारी अधिकारी आहेत की भाजपचे प्रचारक ?  असा सवाल करत महिला पदाधिकाऱ्यांनी कायद्याचे स्पष्टपणे उल्लंघन होत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर निलंबनाची तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या आधी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कुठलीच कार्यवाही झालेली नाही. जर तातडीने कार्यवाही झाली नाही तर मुंबईतील मुख्यमंत्री यांच्या निवास स्थानासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस महिला शहराध्यक्ष विद्याताई देशमाने, शहर कार्याध्यक्ष शालिनीताई वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमिलाताई जाधव यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे✍🏻

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button