भव्य महानाट्य ‘भिमा तुझ्या जन्मामुळे’ पुण्यात रंगणार; ६० कलाकारांचा भव्य संगम…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
अकोट:-
सामाजिक संदेश देणारे नाट्य, प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेश जळगाव नहाटे येथील सम्यकदृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेच्या वतीने एक भव्य सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला असून, “भिमा तुझ्या जन्मामुळे” हे महानाट्य लवकरच पुण्यात रंगणार आहे. या नाट्यप्रयोगात तब्बल ६० कलाकारांचा सहभाग असून, समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. मंगेश चिखले असून, प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. स्वाती चिखले आणि संतोष खवले यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन निखिल वानखेडे यांनी केले आहे.
हे महानाट्य रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले असून, ठिकाण श्री सरस्वती विद्यालयाचे भव्य प्रांगण असे आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या नाट्यप्रयोगामध्ये समाजातील विविध प्रश्न, इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आणि परिवर्तनाचा संदेश प्रभावी पद्धतीने मांडला जाणार आहे. विविध कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे आणि भव्य सादरीकरणामुळे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक कार्यकर्ते व सहकारी परिश्रम घेत असून, या सांस्कृतिक उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “भिमा तुझ्या जन्मामुळे” हे महानाट्य केवळ मनोरंजन नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरणार आहे. पुणेकरांनी या भव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे…..



