बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नांदुरा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

नांदुरा | प्रतिनिधी –अरुण सुरवाडे

नांदुरा नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात प्रभाग क्रमांक 12 च्या नगरसेविका सौ. शितल हरीश काटले यांनी आज नगर परिषद सीओ कार्यालयासमोर एकदिवसीय बैठक आंदोलन केले. नाल्यांवर धाबे टाकण्याच्या प्रलंबित प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
या आंदोलनादरम्यान परिसरातील नागरिकांसह इतर नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनीही आपल्या समस्या मांडल्या. नाल्यांवर योग्य प्रकारे धाबे न टाकल्यामुळे परिसरात अस्वच्छता व आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने संबंधित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
तथापि, दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button