लागल्या हो लागल्या, अखेर बुलढाणा जिल्ह्यात निवडणुका लागल्याच!!! येत्या २८एप्रिल ला होणार मतदान!!! आज पासून आचारसंहिता!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी , रतन भगत. दि.१७/३/२०२६.
( बुलढाणा):-नाही म्हणता म्हणता अखेर बुलढाणा जिल्ह्यात निवडणुका लागल्यात… भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आता बुलढाणा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकारण प्रचंड तापणार आहे. लगीन सरायच्या दिवसातच निवडणुका लागल्याने गाव पुढार्यांची चांगलीच धावपळ होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम घोषित केलाय त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल ला मतदान होणार आहे आज १७ मार्च २०२६ च्या मध्यरात्रीपासून आचारसहिता लागू होणार आहे. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसहिता अस्तित्वात राहणार आहे मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणती कृती घोषणा मंत्री खासदार आमदार व संबंधित स्थानिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठे करता येणार नाही. अशा प्रकारचा असणार आहे हा कार्यक्रम, राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये आज १७ मार्च २०२६ च्या मध्यरात्रीपासून आचारसहिता लागू करण्यात आली आहे निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे. निवडणुकीची अधिसूचना सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी संबंधित तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना प्रकार प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दिनांक ७ ते १३ एप्रिल २०२६ पर्यंत सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी अकरा वाजलेपासून अर्जाची छाननी संपेपर्यंत. दिनांक १७एप्रिल २०२६ रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीचे मतदान मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळविले आहे…✍️



